तीन दिवसांच्या चढाईनंतर नरमले सोने-चांदी!

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सोने आणि चांदीने चांगला कहर केला. गेल्या आठवड्यात सोन्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदी 96 हजारांच्या घरात पोहचली होती. बाजारातील तज्ज्ञांच्या मते सोने लवकरच 81,000 रुपयांची सलामी देईल. तर चांदीचा एक लाखांच्या घरात असेल. या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी चढाई केली होती. सोने 750 रुपये तर चांदीने 6000 रुपयांची झेप घेतली.

या दरवाढीला ब्रेक लागला. सोने-चांदीत पडझड झाली. आता अशा आहेत मौल्यवान धातू्च्या किंमती गेल्या आठवड्यात सोने घसरणीवर होते. सोन्याची किंमत 2700 रुपयांनी उतरली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला तीन दिवसांत त्यात 750 रुपयांची वाढ झाली. 27 मे रोजी 270, 28 मे रोजी 220 तर 29 मे रोजी 270 रुपयांनी सोने वधारले. 30 मे रोजी सोन्यात 440 रुपयांची घसरण आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात चांदीने तीन दिवसांत 6 हजारांहून अधिकची झेप घेतली.

27 मे रोजी चांदीत 1500 रुपयांनी महागली. 28 मे रोजी चांदीने 3500 रुपयांची मोठी झेप घेतली. तर 29 मे रोजी त्यात 1200 रुपयांची भर पडली. 30 मे रोजी चांदीत तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये आहे.इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीचा भाव घसरला. 24 कॅरेट सोने 72,115 रुपये, 23 कॅरेट 71,826 रुपये, 22 कॅरेट सोने 66,057 रुपये झाले.

18 कॅरेट 54,086 रुपये, 14 कॅरेट सोने 42,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 92,673 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.