स्थानिक स्वराज संस्थेत गुलाल घेऊनच येणार; शहाजीबापू पाटील

सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांनी पराभव झाल्यानंतर चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. शहजीबापू पाटील म्हणाले की, ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती, असे ते म्हणाले. दोन वर्षात ५ हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहित आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दीपक आबा यांना आणि देशमुख यांना खडेबोल सुनावले.

सूडाचे राजकारण मी केले नाही करत नाही…शहाजीबापू निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेबांकडून असं पद घेऊन येतो, असे ते म्हणाले. यामुळे शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे, याची चर्चा होत आहे. पुढील स्थानिक स्वराज संस्थेत गुलाल घेऊनच येणार, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.