नुकत्याच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले आणि पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाली. हिवाळी अधिवेशनात आमदारांनी शपथविधी घेतला.आता यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लगबग इच्छुकांची सुरू झालेली पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने व माजी आमदार सुरेश हाळवणकर या दोन नेत्यांना विधान परिषदेसाठी शब्द मिळालेला होता.
आता या दोन नेत्यांपैकी कोणत्या नेत्याला विधान परिषदेवर संधी मिळते याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे. सुरेश हळवणकर हे भारतीय जनता पार्टीचे विश्वासू मानले जातात. राज्यात त्यांना चांगलेच बहुमत आले. रवींद्र माने यांनी निवडणुकीची तयारी चांगली केली होती. चार पैसे खर्चही केले आवडे यांचा त्यांना प्रचार करावा लागला. त्यांनी नाक न मुरडता प्रचार देखील केला होता. त्यामुळे आता विधान परिषदेवर किंवा महामंडळाची संधी नेमकी या दोघांपैकी कोणाला मिळते हे आगामी काळात स्पष्ट होईलच.