पंचांगानुसार, आज 01 डिसेंबर 2024. आज 2024 वर्षातल्या शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस आहे. आज रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास
आज तुमच्या निर्णयात एक प्रकारचा ठामपणा लोकांना दिसेल तो निष्काळजीपणाने केलेली कामे अंगाशी येतील.
वृषभ रास
आर्थिक मान सुधारेल पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय डोळ्यासमोर येतील.
मिथुन रास
समोर आलेली संधी आहे हे ओळखायला लागेल एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले तर तोटा होऊ शकतो.
कर्क रास
आज सर्वांगीण विचार करण्याची आवश्यकता आहे महिला विसर भोळ्या बनतील.
सिंह रास
आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याची वृत्ती राहील व्यसनापासून सावधान राहा.
कन्या रास
आज आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे हातून कोणताही विचार होणार नाही याची काळजी घ्या.
तुळ रास
कलाकारांना आपल्या कल्पनाशक्तीला उत्तम वाव देणाऱ्या संधी मिळतील.
वृश्चिक रास
थोडा हट्टीपणा लहरीपणा आज सोडावा लागेल नोकरी व्यवसायात प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती करू शकाल.
धनु रास
आज कोणाला जामीन राहू नये घरात आणि घराबाहेर अनपेक्षित संकटांमुळे गोंधळून जाल.
मकर रास
पाठीचे दुखणे आणि ॲनिमिक कंडीशन यासारख्या रोगांवर वेळीच औषधोपचार करा.
कुंभ रास
जुनी आणि वसूल होतील महिलांनी लहरीपणा सोडावा.
मीन रास
कोणतीही गोष्ट दुसऱ्याला देताना स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुठे गदा येत नाही ना याचा मागोवा निश्चित घ्याल.