शपथविधी सोहळ्यादिवशी प्रत्येक जिल्ह्यात जल्लोष करण्याचे भाजपचे आदेश

राज्यात सत्तास्थापनेसाठी घडामोडींना वेग आला आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.5 डिसेंबररोजी शपथविधीसाठी मुहूर्त काढण्यात आला आहे. या सोहळ्याची भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप आमदारांशी व्हीसीद्वारे संवाद साधला.

बावनकुळे यांनी 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना आपल्या जिल्ह्यात जल्लोष करण्याचे भाजप प्रदेशकडून आदेश देण्यात आले आहेत. शपथविधीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावले जाणार आहे. सुरेक्षच्या दुष्टीने येणाऱ्या सर्वांना पास देण्यात येणार आहेत.