बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची को-स्टार अभिनेत्री नरगिस फाखरी अचनाक चर्चेत आली आहे. नरगिस तिच्या आगामी सिनेमामुळे किंवा इतर कोणत्या कारणमुळे नाही तर, बहीण आलिया फाखरी हिच्यामुळे चर्चेत आली आहे. नरगिस हिची बहीण आलिया हिने एक्स-बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं आहे. ज्यामुळे न्यूयॉर्क पोलिसांनी अभिनेत्रीच्या बहिणीला अटक केली आहे. अद्याप आलिया फाखरी हिच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाही. पण सध्या ती रिमांडवर असून संबंधित खटल्याची सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे.
नरगिस फाखरी हिची बहीण आलिया न्यूयॉर्क येखील क्वींस याठिकाणी राहते. मिळालेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय आलिया हिने 35 वर्षिय एडवर्ड जॅकब्स नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण गेल्या काही वर्षांपूर्वी दोघे विभक्त झाले. आलिया आणि नरगिस यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, दोघी लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यांचे वडील मोहम्मद फाखरी एक पाकिस्तानी होते आणि त्यांची आई मेरी चेक रिपब्लिकची आहे.
आई – वडील विभक्त झाल्यानंतर काही दिवसांनंतर नरगिस आणि आलिया यांच्या वडिलांचं निधन झालं. आलियावर नुकताच झालेल्या आरोपांबद्दल तिच्या आईला विचारण्यात आलं आहे. आलियाच्या आई म्हणाल्या, ‘विश्वास बसत नाहीये आलियाने कोणाची हत्या केली आहे. आलिया अशी बिलकूल नव्हती. ती कायम सर्वांची काळजी घ्यायची… सर्वांचा मदत करायची…’, त्यांनी खुलासा केला की आलियाला काही काळापासून दातांच्या समस्येनं ग्रासलं होतं. त्यानंतर तिला ओपिओइड्सचं (ड्रग्ज) व्यसन लागले होते.
आलियावरील आरोपांनुसार, 2 नोव्हेंबरला आलिया जेकब्सच्या गॅरेजमध्ये पोहोचली, जिथे तिने आज तुम्ही सर्व मरणार आहात, अशी ओरडत होती… धमकी देत असताना एका शेजाऱ्याने पाहिलं होतं. शेजारच्या व्यक्तीने कोर्टात सांगितलं, धमकी दिल्यानंतर आलियाने गॅरेजला आग लावली. जेकब्सच्या आईने कोर्टात सांगितले की, जेकब्स आणि आलियाचं नातं वर्षभरापूर्वीच संपलं होतं, मात्र आलियाला ते सहन होत नव्हतं. आतापर्यंत या प्रकरणी नर्गिसचे कोणतेही वक्तव्य समोर आलेलं नाही.