15 डिसेंबर 2024 म्हणजेच रविवार हा क्रिकेट चाहत्यांसाठी सुपरसंडे असणार आहे. विशेषत: भारतीय क्रिकेट चाहत्यांना थराराचा दुहेरी डोस मिळणार आहे.एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला आहे, तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची चाहत्यांना नेहमीच प्रतीक्षा असते.15 डिसेंबर रोजी होणारा सामना भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये अंडर-19 आशिया चषकात होणार आहे. मलेशियामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. ही मॅच लाईव्ह पाहण्यासाठी लागणारी प्रत्येक माहिती जाणून घ्या.
गेल्या आठवड्यात, भारतीय पुरुष अंडर-19 संघ ACC अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपदापासून वंचित राहिला. मात्र, आता ही स्पर्धा जिंकण्याची जबाबदारी महिला संघावर आहे. 15 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या अंडर-19 महिला टी-20 आशिया चषकात भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
मलेशियातील क्वालालंपूर येथील बेउमास ओव्हल येथे हा सामना होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने याच मैदानावर खेळवले जातील.अंडर-19 महिला आशिया चषक 2024 मधील भारत आणि पाकिस्तान महिला संघांमधला नाणेफेक IST सकाळी 11:00 वाजता ब्यूमास ओव्हल येथे होईल.
सामना किती वाजता सुरू होईल?
अंडर-19 महिला आशिया कप 2024 मधील भारत आणि पाकिस्तान महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता सुरू होईल.भारत आणि पाकिस्तान महिला संघांदरम्यान अंडर-19 महिला आशिया कप 2024 चे थेट प्रक्षेपण भारतात Sony Ten 5 SD/HD वर उपलब्ध असेल. याशिवाय SonyLIV ॲप आणि वेबसाइटवर सामना उपलब्ध असेल.