‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस

महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या एका चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला होता.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान देखील पाहायला मिळाले होते.

दरम्यान, आता राज्यात पुन्हा एकदा तशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. पंजाबराव सांगतात की, राज्यात 20 डिसेंबर पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.21 तारखेनंतर राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र अर्थातच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता या काळात पाहायला मिळेल.