अलीकडच्या काळात पालक व मुलामुलींच्या अपेक्षा उंचावत आहेत. यामुळे मनासारखी उच्चविद्याभूषित स्थळ शोधण्यासाठी पालकांचा पैसा व वेळ वाया जाऊ नये यासाठी सांगोला येथे रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी माळी समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ. प्रभाकर माळी यांनी पत्रकारांना दिली.
वधु-वर व पालक यांना एकाच ठिकाणी त्यांच्या पसंतीचे स्थळ त्यांना मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकीतून माळी जीवनसाथी संस्था वधु-वर मेळावे आयोजित करत आहे. हा मेळावा रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सांगोला येथील महुद रोडवरील गणेश मंगल कार्यालय येथे सकाळी ९
ते ४ या वेळेत संपन्न होणार आहे.
या मेळाव्यात सहभागी होणा-या वधु-वर यांनी स्वतःचा
बायोडाटा, दोन कलर आयडंटी फोटो तसेच नोंदणी शुल्क तीनशे रूपये सोबत घेऊन यावे. नोंदणी केलेल्या वधु-वर यांना अल्पोपाहार, चहा आणि दोन व्यक्तीसाठी भोजन देण्यात येणार आहे.
या मेळाव्यात नोंदणी केलेल्या इच्छुक वधु-वर यांनी आपला परिचय स्वतः स्टेजवर येऊन परिचय करुन देणे आवश्यक आहे. सदर मेळाव्याचा अंक प्रकाशित करण्यात येणार असुन नोंदणी केलेल्या उमेदवारांना तो मोफत देण्यात येणार आहे.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी डॉ. प्रभाकर माळी ९४२३३२७५४६, प्रा. ज्ञानेश्वर माळी – ९८८११७५६१७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.