रुकडीचा भुयारी मार्ग १० जानेवारीपर्यंत बंद!

रुकडी (ता. हातकणंगले) येथील गेट नंबर २२ भुयारी मार्गाच्या दुरावस्थेची पाहणी खासदार धैर्यशील माने यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत केली होती. यावेळी मार्गातील समस्यांविषयी सूचना केल्या होत्या. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष कामाची सुरुवात करून अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे सदर कामाला सुरुवात होणार असून १० जानेवारी पर्यंत सदर भुयारी मार्ग बंद राहणार आहे. या कालावधीसाठी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदार संघातील रेल्वे भुयारी मार्ग व प्रवाशांच्या इतर सोई सुविधांसाठी ६ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

यामध्ये रुकडी गेट क्र. २२ व हातकणंगले गेट क्र. १७ साठी १ कोटी रुपयांचा निधी, जैनापूर गेट क्र. ७ व निमशिरगांव गेट क्र. ९ साठी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे.