अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचत आहे. ‘छावा’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा कधी मोठ्या पडद्यावर येणार याप्रतीक्षेतच चाहते होते. अखेर 14 फेब्रुवारी रोजी चाहत्यांची प्रतीक्षा संपली. ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. तीन दिवसांत सिनेमाने जवळपास 72.4 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शिक होणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.मोठ्या पडद्यावर राज्य केल्यानंतर ‘छावा’ सिनेमा कोणत्या ओटीटी प्लेटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. सांगायचं झालं तर, कोणताही सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी निर्माते त्यांचे डिजिटल अधिकार विकतात. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘छावा’ सिनेमाच्या बाबतीतही असेच काहीसं घडलं आहे. थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी सिनेमाच्या ओटीटी रिलीज पार्टनरसोबत करार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘छावा’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) वर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. असं सांगितलं जातं की, सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असल्यास सिनेमा 50 – 60 दिवसांनंतर प्रदर्शित होतो.