आमदार जयंतराव पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…….

काल आमदार जयंतराव पाटील यांचा वाढदिवस विविध भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. अनेक उपक्रम गावोगावी राबविण्यात आले. बागणी गावात विकास कामांची गंगा आमदार जयंतराव पाटील यांनी आणली आहे. गावातील प्रत्येक चौक व अन्य रस्ते यासह अनेक कामे ही आमदार पाटील यांनी केली आहेत. त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे अशी कामे त्यांच्या हातून घडली आहेत. 

बागणी येथील आमदार जयंतराव पाटील विचारमंच यांच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा येथे वही, पेन, खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी दूध संघाचे संचालक अल्लाउद्दीन चौगले, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, के. बी. पाटील, भगवानराव पाटील, बाजीराव खोत, पप्पू शेळके, इंजी. विनोद पाटील, जगदीश माळी, विश्वनाथ शेटे, रमेश पाटील, अन्सार सुतार, नंदकुमार शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कार्यालय येथे सुरवातीस केक कापण्यात आला.

अल्लाउद्दीन चौगले, प्रशांत पाटील, के बी पाटील म्हणाले भविष्यात नक्कीच वेळ बदलेल आणि पुन्हा आमदार साहेब हे मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. जयंतराव म्हणजे सामान्य लोकांचे भाग्यविधाते आहेत. त्यांनी सामाजिक कार्याला जास्त महत्त्व देत राजकारण कमी केले आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून येणाऱ्या प्रत्येकाचे काम कसोशीने करणे हे त्यांनी पाळले आहे. युवकांना देखील त्यांनी अनेक ठिकाणी संधी देऊन समाजकारणात व राजकारणात पुढे आणले आहे यावेळी हुतात्मा चौक येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.