उत्तरप्रदेशमधून दागिने घेऊन पसार झालेल्या संशयित आरोपीस इस्लामपूर येथे अटक करण्यात आली आहे. संशयीत आरोपी महेश मस्के (रा. नागरा असे त्याचे नाव
आहे. त्याच्याकडून सत्तेचाळीस लाख दोन हजार पाचशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हयामध्ये आरोपी महेश मस्के व त्यांचे साथीदार यांनी फिर्यादी अय्यूब सुप यांच्या परिवारातील उत्तरप्रदेश येथील सराफी व्यापारी संपतराव लवटे यांच्याकडील सोने व चांदीमधील शुध्द चांदी व सोने काढून देतो व त्याची बाजारामध्ये विक्री करुन येणारी रक्कम तुम्हाला देतो असे सांगून १५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेतलेली होती.
त्यानंतर फिर्यादी यांना ती परत न करता त्यांची फसवणुक करून फरारी झाले होते. त्याची तक्रार दाखल होती. उत्तरप्रदेश मधील बजारिया पोलीस ठाण्यात हा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
उत्तरप्रदेश येथून पोलीस अधिकारी कमलेश पटेल व त्यांचा पोलीस स्टाफ आरोपीच्या शोधात होते. इस्लामपूर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ असे शोध मोहीम सुरू होती. उत्तरप्रदेश मधील पोलीस एकत्रित तपास करीत असताना गुन्हयातील संशयीत आरोपी महेश विलास मस्के हा इस्लामपूर बस स्टैन्ड येथे असलेचे खात्री लायक माहिती मिळताच त्यास ताब्यात घेतले. त्यानंत आरोपी महेश विलास मस्के (रा. नागराळे) यास ताब्यात घेतले.
त्यानंतर आरोपी याचेकडे उत्तरप्रदेश मधील पोलीस अधिकारी यांचे गुन्हयाच्या तपासा करता मदतीने तपास करीत असताना आरोपी यांचेकडून १५ किलो १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे लगड, १६ तोळे वजनाचे सोन्याचे लगड, टंच काढण्याची मशीन व संगणक सिपीयु साहित्य, रोख रक्कम एक लाख दोन हजार पाचशे ऐंशी रुपये असा माल एकुण सत्तेचाळीस लाख दोन हजार पाचशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.
सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक कमलेश पटेल व उत्तरप्रदेश पोलीस स्टाफ तसेच इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, सपोनि सागर वरुटे, हरिचंद्र गावडे, लोखंडे, माजी मुख रोडे यांनी सहभाग घेतला.