इचलकरंजीत जिम्नॅशियम मैदानात आवश्यक त्या सुविधा देणार : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी येथील जिम्नॅशियम मैदानात खेळाडूंच्या मागणीनुसार आवश्यक त्या सुविधांसह संपूर्ण मैदानाभोवती जाळीचे कंपाऊंड आणि मैदानासाठी आवश्यक रोलर आमदार फंडातून पूर्ण करून देऊ, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी खेळाडूंना दिली.

हे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी या सर्व कामांचे एस्टिमेट तयार करून घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. इचलकरंजीत पुढच्या वर्षी भाई नेरकर पक खो-खो स्पर्धा आयोजित केली जाणार असून त्यासाठी क्रीडामंत्र्यांनी मंजूरी दिल्याचेही त्यांनी सांगताच खेळाडूंनी जल्लोष केला.

जिम्नॅशियम मैदानात आणि येथील इमारतीत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी उदय धातुंडे, धनंजय पोवार आणि तात्यासाहेब कुंभोजे यांच्या नेतृत्वाखालील शेकडो क्रिकेट खेळाडूंनी आमदार आवाडे यांची भेट घेतली. यावेळी मैदानात भेडसावणार्या अडचणी, समस्यांसह आवश्यक त्या सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.

त्यावर आमदार आवाडे यांनी यवनगरीबरोबरच इचलकरंजीची] क्रिडानगरी म्हणूनही ओळख बनली आहे. या शहराने खो-खो, कबड्डी, क्रिकेट योगा व्हॉलीबॉल, फुटबॉल अशा सर्वच क्षेत्रात उतुंग भरारी घेतलीआहे. अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. यापैकीच एक म्हणजे जिम्नॅशियम मैदान असून येथे टेनिसबॉल क्रिकेट खेळले जाते.

या मैदानात आवश्यक त्या सोयी-सुविधा आमदार फंडातून उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर आमदार फंडातून रोलर देऊ, मैदानाभोवती जाळीचे कंपाऊंड उभारण्यात येईल. या ठिकाणची इमारत अत्यंत जुनी झाली असून बोगासरासाठी येणार्याना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

त्यामुळे इमारतीची दुरुस्ती करून स्वच्छतागृह, चेजिंग रुमच्या सुविधा आमदार फंडातून उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासंदर्भातील एस्टिमेट तयार करून ही कामे लवकर मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार आवाडे यांनी दिली. यावेळी राजू आंबी, बचन कोळी, नासिर शिरगांवे, नंदू माळी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.