Farmer ID Card : शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सीएससी केंद्रांवर गर्दीच गर्दी! घरबसल्या अशी करा नोंदणी…..

भारत सरकारच्या ‘अॅग्रीस्टॅक’ (Agristack) संकल्पनेला राज्य शासनाने हिरवा कंदील दिला असून, याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तीन महत्त्वाचे माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी www.mhfr.agristack.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे.सध्या राज्यात शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दाखवत आहेत. यामुळे सीएससी केंद्रांवर गर्दीच गर्दी होताना दिसत आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला घरबसल्या शेतकरी ओळखपत्र कसं काढायचे? याची माहिती देणार आहोत.

अॅग्रीस्टॅक म्हणजे काय?

अॅग्रीस्टॅक हा शेतकऱ्यांच्या डिजिटल डेटाबेसचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याअंतर्गत खालील तीन प्रकारच्या माहिती संचांचा समावेश असेल:शेतकरी व त्यांच्या शेतीशी संबंधित आधार संलग्न माहिती संच,हंगामी पिकांचा डेटा आणि माहिती संच, शेतीच्या भूभागाची नोंद व गावाच्या नकाशांची माहिती

नोंदणी का आवश्यक आहे?

शेतकऱ्यांचा एकसंध डेटा उपलब्ध करून त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळवून देणे.

डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांचे ओळखपत्र निर्माण करून त्यांना सबसिडी, कर्जसुविधा,विमा आणि इतर योजनांचा लाभ सोपा करणे.

पिकांच्या उत्पादन आणि भूभागावर आधारित धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करणे.

शेतकरी ओळख क्रमांक कसा तयार करावा?

शेतकऱ्यांनी स्वतःच्या माहितीची नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) निर्माण करणे अनिवार्य आहे. यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

नोंदणी कशी कराल?

1) सर्वप्रथम https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

2) नंतर अॅग्रीस्टॅक पेज उघडा मुख्य पेजवर ‘Farmer Registry’ या पर्यायावर क्लिक करा.

3) शेतकरी म्हणून नोंदणी करा,पुढील पेजवर ‘Official’ आणि ‘Farmer’ असे दोन पर्याय दिसतील.’Farmer’ हा पर्याय निवडा.

4) नवीन खाते तयार करा ‘Create New User Account’ वर क्लिक करा.
तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा. पुढील प्रक्रियेनुसार तुमची नोंदणी पूर्ण करा.