काल दसऱ्याचा अर्थातच विजयादशमीचा आनंददायी सण साजरा झालाय. आता दिवाळीचा मोठा पर्व येणार आहे. दिवाळी सणाला नेहमीच शहरात कामानिमित्त स्थायिक झालेले नागरिक आपल्या मूळ गावाकडे, मामाच्या गावाकडे परतत असतात.भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. ही हंगामी भाडेवाढ आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने दहा टक्के भाडेवाढ जाहीर केलेली आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात एसटी महामंडळ हंगामी भाडेवाढ करत असते.या भाडेवाढ नुसार सर्व प्रकारच्या एसटीच्या तिकीटदरात वाढ झालेली आहे.
ही भाडेवाढ 25 ऑक्टोबर 2024 ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. एसटी महामंडळ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. परिवर्तन, शिवनेरी, शिवशाही आदि सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटांमध्ये १० टक्के भाडेवाढ केली जाणार अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर आली आहे.