आजच्या युगामध्ये शिक्षणाचा कल हा सगळ्यांनाच आहे. प्रत्येक जण हा जास्तीत जास्त कसे आपल्याला ज्ञान प्राप्त होईल याकडे लक्ष देत असतात. तसेच शिक्षणामध्ये स्पर्धा परीक्षा देखील खूपच वाढलेले आहेत. जणू काही शिक्षणाची एक स्पर्धाच चाललेली आहे चढाओढ ही प्रत्येकालाच असते. म्हणजेच मी पुढे कसा जाईन याकडे विद्यार्थी पुरेपूर लक्ष देत राहतात.
डीवायपी टेक्निकल कॅम्पस तळसंदे येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या दिप्ती सूर्यवंशी, दिव्या पाटील यांची शनायडर इलैक्टिक या कंपनीत निवड झाल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी अक्षय खामकर यांनी दिली. ही एक फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी आहे. डिजिटल ऑटोमेशन आणि ऊर्जा व्यवस्थापनामध्ये ही कंपनी कार्यरत आहे.
ही कंपनी ऊर्जा तंत्रज्ञान, रिअल टाइम ऑटोमेशन, सॉफ्टवेअर आणि सेवा, घरे, इमारती, डेटा सेंटर, पायाभूत सुविधा आणि उद्योगांना सेवा पुरवते.ग्रामीण भागातून मध्यमवर्गीय कुटुंबातील दीप्ती आणि दिव्या यांनी मिळवलेल्या यशाबद्दल यांचे खूपच कौतुक होत आहे.
या दोघींना प्रतिवर्षी ३.७५ लक्ष प्रतीवर्ष या पॅकेजवर डिप्लोमा इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम पूर्ण करून या दोघीनी ही संधी मिळवलेली आहे. कॅम्पस संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी या दोघींचे खूपच कौतुक केलेले आहे आणि पुढच्या वाटचालीस यांना शुभेच्छा आहे दिल्या आहेत.
महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध कौशल्यविषयक प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो. याचा महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले. या निवडीमध्ये इलेक्टिकल विभागाच्या विभागप्रमुख प्रा. स्मिता परमाज, पॉलिटेक्निक समन्वयिका प्रा. कलिका पाटील, रजिस्टार पी. एम. भागाजे, पॉलिटेक्निकचे प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्षआमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार र ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए. के. गुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.