Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे स्टॉक खरेदी करा, होणार मालामाल………

भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती कोसळल्या आहेत. असे अनेक शेअर्स आहेत जे त्यांच्या उच्चांकावरून 30 ते 40 टक्क्यांनी घसरले आहेत.अशा परिस्थितीत, विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने गुंतवणूकदारांसाठी आपली इक्विटी स्ट्रॅटेजी तयार करताना, कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी हे सांगितले आहे. जेफरीजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, जेफच्या इंडिया कव्हरेजमध्ये समाविष्ट असलेले अनेक स्टॉक्स जून 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत घसरले आहेत.

जेफरीजला काही शेअर्स सापडले आहेत ज्यात गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देण्याची क्षमता आहे. या यादीत संरक्षणापासून ते एअरलाइन्स, सरकारी आणि खाजगी बँका आणि FMCG शेअर्सच्या नावांचा समावेश आहे.

पंजाब नॅशनल बँक

जेफरीजने गुंतवणूकदारांना पीएनबीचे (पंजाब नॅशनल बँक) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बँकेचा शेअर 99.49 रुपयांवर व्यवहार करत असून त्याने 142.90 रुपयांचा उच्चांक गाठला होता. PNB चे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून 30 टक्क्यांनी घसरले आहेत. जेफरीजने स्टॉकसाठी 135 रुपये लक्ष्य किंमत ठेवली आहे.

गोदरेज कंझ्युमर

जेफरीजने गोदरेज कंझ्युमरचा देखील 14 स्टॉक्सच्या बकेट लिस्टमध्ये समावेश केला आहे. GCPL चा शेअर सध्या 1175 रुपयांवर आहे आणि शेअरने 1,541.85 चा उच्चांक गाठला आहे. सध्या गोदरेज कंझ्युमरचे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून 24 टक्क्यांनी घसरले आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL)

मल्टीबॅगर सरकारी संरक्षण कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स जेफरीजच्या स्टॉकच्या यादीत आहे. एचएएलचा शेअर सध्या 4087 रुपयांवर आहे परंतु यावर्षी स्टॉकने 5674 रुपयांचा उच्चांक गाठला होता आणि या पातळीपासून स्टॉक 28 टक्क्यांनी घसरला आहे.

कोल इंडिया

देशातील सर्वात मोठी कोळसा कंपनी कोल इंडियाच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. हा शेअर सध्या 409.75 रुपयांवर व्यवहार करत आहे परंतु त्याने 543.55 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. स्टॉक त्याच्या उच्चांकावरून 25 टक्क्यांनी घसरला आहे. जेफरीजने कोल इंडियाचा समावेश आपल्या स्टॉक्समध्ये केला आहे.