बॉलिवूडचे ‘हे’ 5 सेलिब्रिटी ज्यांनी चाळीशीनंतर थाटला संसार, एका अभिनेत्याचं तर तिसरं लग्न

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी चाळीशीनंतर संसार थाटला. हेच सेलिब्रिटी आता चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर या पाच सेलिब्रिटी कपलचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. यामधील एका सेलिब्रिटीने तर तिसऱ्यांदा संसार थाटला आहे.

उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने वयाच्या 42 व्या वर्ष उद्योजक आणि मॉडेल मोहसिन मिर याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेत्रीने लग्न केलं.

प्रिती झिंटा

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील वयाच्या 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्रीने जीन गुडइनफ सोबत लग्न केलं. अभिनेत्रीने लग्नानंतर सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांच जगात स्वागत केलं आहे.

जॉन अब्राहम

अभिनेता जॉन अब्राहम याने देखील 41 व्या वर्षी लग्न केलं. अभिनेत्याने प्रिया रंचल हिच्यासोबत लग्न केलं. दोघे आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.

सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खान याने देखील चाळीशीनंतर दुसरं लग्न केलं. वयाच्या 42 व्या वर्षी सैफ अली खान याने करीना कपूर सोबत लग्न केलं. अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आमृता सिंग आहे.

संजय दत्त

अभिनेता संजय याने देखील वयाच्या 48 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. अभिनेत्याने मान्यत दत्त हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. संजूबाबा आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.