‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रो लवकरच सुरू, एमएमआरडीएकडून चाचणी होणार

मिरा-भाईंदरकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागलेल्या ‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रोची चाचणी एमएमआरडीएकडून लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी नुकतीच पूर्ण झाली असल्याचे समजते. ही चाचणी पुढील काही महिने चालणार असल्याने डिसेंबरअखेरीस दहिसर ते काशिगावपर्यंतचा मेट्रोचा पहिला टप्पा नागरिकांच्या सेवेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मेट्रोचे काम प्रगतिपथावर आले आहे. या प्रकल्पाचे दहिसर ते काशिगावपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे ९७ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

मेट्रो रूळ अंथरण्यात आले असून विद्युतवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्याच्या तपासणीचे काम गेल्या काही दिवसांपासून केले जात जाते. तेही नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोची चाचणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच हे काम एमएमआरडीएकडून हाती घेतले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडणार –

मिरा-भाईंदर मेट्रोचे काम दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांत केले जात आहे. पहिल्या टप्याचे काम पूर्णत्वास आले असले तरी दुसऱ्या टप्प्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यातील सेवा सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फडणवीस-शिंदे यांची उपस्थिती

मिरा-भाईंदर ते दहिसर मेट्रोची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी त्यांच्याकडे चालू आठवड्याची वेळ मागण्यात आली आहे. त्यांच्याकडून वेळ प्राप्त झाल्यावर चाचणीची तारीख जाहीर केली जाणार आहे.