मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या ७ वर्षांपासून सिने पडद्यावरून गायब आहे. ती शेवटची २०१८ मध्ये शाहरुख खानसोबत ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती, मात्र तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर ती चकदा एक्सप्रेस या आगामी सिनेमात दिसणार असल्याचे बोलले गेले. हा सिनेमा महिला क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारित होता. पण बराच काळ लोटला तरीही अजून तो रिलीज झालेला नाही. असे म्हटले जाते की या सिनेमासाठी विराट कोहलीने तिला विशेष ट्रेनिंग दिल्याचे म्हटले जाते.
भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तिच्या ‘चकदा एक्सप्रेस’ या बायोपिकच्या रिलीजला झालेल्या विलंबावर प्रतिक्रिया दिली आहे.
याबद्दल झुलन गोस्वामींनी सांगितले की त्यांना कोणीच रिलीजबद्दल सांगितलेले नाही. ‘मला कोणतीही बातमी नाही आणि सर्वजण मला फोन करत आहेत.’ माझ्याकडे यावर भाष्य करण्यासारखे काहीच नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे झुलन गोस्वामींनी त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. अभिनेता दिव्येंदु भट्टाचार्य यांनी यापूर्वी सांगितले होते की चित्रपटाचे शूटिंग खूप चांगले झाले आहे मात्र त्यांनी चित्रपटाच्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती.

‘चकदा एक्सप्रेस’ मध्ये कोण कोण आहेत?
दरम्यान, एडिटर मानस मित्तल यांनीही ‘हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला सांगितले की, हा चित्रपट क्रिकेट विश्वचषकापूर्वी रिलीज करण्याची योजना होती पण ते शक्य झाले नाही. त्याचवेळी, अभिनेत्री अनुष्का शर्मानेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रोसित रॉय दिग्दर्शित या चित्रपटात रेणुका शहाणे, अंशुल चौहान, कौशिक सेन आणि महेश ठाकूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.