नवरत्न कंपनी पाचव्यांदा देणार Bonus Share, रेकॉर्ड तारीख जुलैच्या पहिल्या आठवड्यात

नवरत्न कंपनी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने आपल्या भागधारकांना बोनस (Bonus) शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1:4 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच, कंपनी प्रत्येक 4 शेअर्ससाठी 1 मोफत शेअर देईल. कंटेनर कॉर्पोरेशनने बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

Container Corporation of India 2008 नंतर पाचव्यांदा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. यावेळी गुंतवणूकदारांना 4 शेअर्सवर 1 शेअर बोनस मिळेल. या बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख 4 जुलै 2025 निश्चित केली आहे. शुक्रवारी शेअर्स वधारून 730.95 रुपयांवर व्यवहार करत आहे.

Container Corporation of India पाचव्यांदा बोनस शेअर्स देणार आहे. याआधी कंपनीने चार वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने एप्रिल 2008 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले. म्हणजेच, कंपनीने प्रत्येक 1 शेअरसाठी 1 बोनस शेअर वाटला. त्यानंतर, कंटेनर कॉर्पोरेशनने सप्टेंबर 2013 मध्ये 1:2च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले. म्हणजेच, कंपनीने प्रत्येक 2 शेअर्ससाठी 1 बोनस शेअर दिला. नवरत्न कंपनीने एप्रिल 2017 आणि फेब्रुवारी 2019 मध्ये 1:4 च्या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप केले. कंपनीने प्रत्येक ४ शेअर्ससाठी १ बोनस शेअर दिला. कंपनी आता पाचव्यांदा बोनस शेअर्स देणार आहे.

कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने शेअर्सचे विभाजन म्हणजेच स्टाॅक स्प्लिटही केले होते. जून 2018 मध्ये कंपनीने त्यांचे शेअर्स 2 भागात विभागले. कंपनीने त्यांचे 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 5 रुपये दर्शनी मूल्याचे 2 शेअर्समध्ये विभागले. गुरुवार, 19 जून 2025 रोजी कंटेनर कॉर्पोरेशनचे शेअर्स 726.50 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 34 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्याच वेळी गेल्या पाच वर्षांत शेअर्समध्ये 77 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.