सिनेसृष्टीला आणखी एक धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध गायकाचं निधन झालं (Cinema industry) असून म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ४०व्या वर्षी गायकाने अखेरचा श्वास घेतला.

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणातील प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांचं निधन झालं आहे. (Cinema industry) त्यांच्या निधनाने म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. राजू मागील काही दिवसांपासून रुग्णालयात भरती होते. मंगळवारी सकाळी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

हरियाणवी म्युझिक इंडस्ट्री आणि गायकाच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. राजू मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर २२ ऑगस्ट रोजी वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

राजू यांना कावीळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कावीळ झाल्यानंतर गायकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या उपचारानंतर त्यांची तब्येत सुधारली होती, त्यांना घरीदेखील सोडण्यात आलं होतं. पण अचानक त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हिसार येथील आझादनगरमध्ये राजू यांचं घर आहे. राजू यांच्या मागे त्यांची पत्नी आणि तीन मुली असं कुटुंब आहे.

सपना चौधरीसह राजू पंजाबी यांची हिट जोडी होती. राजू हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील म्युझिक इंडस्ट्रीतील पॉप्युलर नाव होतं. राजू पंजाबी यांचं शेवटचं गाणं १२ ऑगस्ट रोजी रिलीज झालं होतं. गाणं रिलीज झालं त्यावेळी ते रुग्णालयातच होतं. हे गाणं तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला होता. अखेर ते ऑगस्टमध्ये रिलीज झालं, पण राजू यांना त्याचा आनंद फार काळ घेता आला नाही.

राजू यांच्यावर त्यांच्या गावी रावतसर इथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राजू यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या हिसार आझादनगर येथील घरी अनेकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. राजू यांच्या जाण्याने मोठा लॉस झाल्याची प्रतिक्रिया इंडस्ट्रीतून व्यक्त होत आहे.

City Varta:-

रामलिंग दर्शनासाठी जाताना बायकोचा अपघात; हे समजताच पतीला हृदयविकाराचा झटका