भाजपच्या महायुतीची तयारी सुरु नवीन रणनीतीमध्ये असा असणार महत्वाचा बदल..

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा  निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षाकडून बैठकांचे सत्र सुरु आहे. सर्व्हे केले जात आहे. मिशन 350+ साठी मोठी रणनीती तयार केली आहे. यामुळे भाजपच्या विद्यामान खासदार गॅसवर आले आहे. नवीन धोरणानुसार भाजप जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना निवडणुकीत मैदानात उतरवणार आहे. त्यासाठी 40 ते 55 वर्षाच्या उमेदवारांना भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 145 पेक्षा जास्त तरुण चेहऱ्यांना भाजप संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिला. ज्या विद्यमान खासदारांचे भाजप तिकीट कापणार त्यांना पक्षसंघटनेत जबाबदारी देणार आहे.

भाजपची रविवारी पुणे शहरात बैठक झाली. या राष्ट्रीय बैठकीत संघटनात्मक चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली. यावेळी रामजन्मभूमी सोहळा, सुपर वॉरियर्स यासह विविध उपक्रमांच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. या बैठकीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. बैठकीला राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी एल संतोष, सहसंघटक मंत्री शिव प्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन उपस्थितीत होते. राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच बैठकीचे निमंत्रण दिले होते. भाजपकडून सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका घेणार आहे. दोन बैठका घेऊन उमेदवारांसंदर्भात चर्चा होणार आहे.

महायुतीची तयारी सुरु

लोकसभा निवडणुकीला यवतमाळ जिल्ह्यात महायुती लागली कामाला आहे. महायुतीतील जिल्ह्यातील प्रमुख एकत्रितपणे घेणार महायुतीचे समन्वय मेळावे सुरु झाले आहे. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी आ. मदन येरावार ,राष्ट्रवादी चे इंद्रनील नाईक ,आ अशोक उईके जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार राहणार प्रत्येक मेळाव्याला उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या विरोधात एकीचे बळ महायुती दाखविणार आहेत. संजय राठोड आणि भावना गवळी एकाच व्यासपीठावर यामाध्यमातून एकत्र आले.