व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. लवकरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅप यूजर्सनाही ब्लू टिक मिळणार आहे. मेटाने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅप बिझनेस अकाउंट असणाऱ्यांना या फीचरचा फायदा होणार आहे.WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये बिझनेस अकाउंट असणाऱ्या व्हॉट्सअॅप यूजर्सना सेटिंग्समध्ये एक नवीन पर्याय मिळणार आहे. यामध्ये यूजर्सना बिझनेस मेटा व्हेरिफिकेशन विकत घेण्याचा ऑप्शन मिळेल.
यामुळे आपलं बिझनेस अकाउंट अधिकृत आहे हे यूजर्सना दाखवता येणार आहे. यासाठी यूजर्सना व्हॉट्सअॅपचं बिझनेस अॅप घ्यावं लागेल. त्यामध्ये बिझनेस अकाउंटवरुन लॉग-इन करावं लागेल. यानंतर यूजर्स ब्लू टिक खरेदी करू शकतील. याची किंमत किती असेल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल, त्यावेळी कदाचित ही किंमत जाहीर केली जाऊ शकते.व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपमध्ये रेग्युलर अॅपच्या तुलनेत अधिक फीचर्स असतात. यामध्ये ऑटो रिप्लाय आणि इनसाईट्स पाहण्यासाठी अधिक टूल्स देण्यात आले आहेत.
छोट्या व्यापाऱ्यांसाठी याचा भरपूर फायदा होतो. आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या प्रमोशनसाठी हे अॅप फायद्याचं आहे. आता व्हेरिफिकेशन बॅज मिळाल्यामुळे देखील व्यापाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.