पेठ- सांगली रस्त्याच्या विकासाला मिळणार गती…..

सगळीकडे रस्त्यांची दुरावस्था झालेली पाहायला मिळतेच. रस्त्यावरती खूप मोठमोठे खड्डे देखील आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच नेमके कळत नसल्याचे चित्र आपणाला मिळत आहे.

पेठ सांगली या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे आणि या रस्त्याच्या चौपदरीकरणाने सांगली जिल्ह्याच्या विकासाला गती देखील मिळणार आहे. रस्त्याचे काम हे वेळेत तसेच दर्जेदार होईल असा विश्वास खा. संजय पाटील यांनी व्यक्त केलेला आहे.

या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खा. पाटील यांच्या हस्ते व भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार पाटील म्हणाले रस्त्यांची दुरावस्था झाल्याने लोकांमधून खूपच संतप्त प्रतिक्रिया येत होत्या तसेच आंदोलने ही झाली. परंतु आता या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे आणि हे काम वेळेत व दर्जेदार होणार आहे.