12 तासांच्या चौकशीनंतर ‘या’ तारखेला पुन्हा बोलावलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची ईडीची चौकशी झाली. तब्बल बारा तास सुरु असलेल्या मॅरेथॉन चौकशीनंतर रोहित पवार यांना पुढील तारीख देण्यात आलीये. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणात ईडीची चौकशी सुरू आहे. रोहित पवार चौकशी संपल्यावर ईडी कार्यालयाच्या बाहेर पडल्यावर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. इतकंच नाहीतर रोहित पवारांना खांद्यावर उचलून घेतलं त्यानंतर पवारांनी भाषण करत आपली प्रतिक्रिया दिली.

आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे. आपला जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे त्यामुळे हा विचारांचा वारसा जपण्यासाठी सर्वांची संघर्षाची भूमिक आहे का असा सवाल रोहित पवारांनी केला. आज बारा तास चौकशी झाली असली तरी परत 1 तारखेला बोलावलं आहे.

एक तारखेला आणखी माहिती द्यायला सांगितली आहे. मी व्यवसायामध्ये आधी आलो मग राजकारणात आलो. प्रामाणिकपणे व्यवसाय केला. काही लोक आधी राजकारणात आले आणि नंतर सहजपणे व्यवसाय केला. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही. त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा असा माझा त्यांना प्रश्न असल्याचं रोहित पवार म्हणाले.