आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बँकिंग तसेच इतरही अनेक क्षेत्रातील नियमांत बदल झालेला आहे. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचा दरातही बदल होतो.मार्च महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही.
मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच दार 1900 रुपयांपर्यंत गेला आहे. याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातदेखील गॅस सिलिंडरच्या या दरात वाढ झालेली होती. या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये 94 रुपयांची वाढ झालेली आहे.