अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करवीरनिवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तीर्थक्षेत्र विकास केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी बोलताना सांगितले. ते अल्पकाळ कोल्हापूर दौर्‍यावर आले होते.सातारा जिल्हा दौरा आटोपून मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापुरात रात्री नऊ वाजता आगमन झाले. खासदार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक येतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात, परिसराचा विकास व्हावा, याकरिता आराखडा तयार केला जात आहे. नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आहे. या आराखड्याला गती दिली जाईल.