गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊन उलथापालथ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून, काँग्रेसचे १५ आमदार फुटून महायुतीसोबत जातील, असा दावा केला जात आहे
येत्या महिनाभरात या घडामोडी होतील, असा दावा केला जात आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभरात सरकार विरोधात वातावरणनिर्मिती केली जात आहे.
ही यात्रा २० मार्च २०२४ रोजी मुंबईत समाप्त होणार आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असतानाच काँग्रेसला धक्का देण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीदरम्यानच हा भूकंप घडवून आणला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे.