अभिनेता विक्रांत मेसी सध्या ’12th फेल’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ’12th फेल’ सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियेत मोठी वाढ झाली आहे. सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी विक्रांत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. पण आता अभिनेत्याने टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. शिवाय यामागचं अभिनेत्रीने कारण देखील सांगितलं आहे. शिवाय टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि भुमिकांबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विक्रांत मेसी याने इंडस्ट्री सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ‘टीव्ही इंडस्ट्री सोडण्यामागे फक्त एकच कारण नाही. टीव्ही विश्वात काम करताना माझं मन रमत नव्हतं. कारण ज्या प्रकारचा कंटेंट असतो, मला आवडत नाही. मला ते काम कमी दर्जाचं वाटतं. कदाचित ही त्यांची मनोरंजनाची व्याख्या असावी. ते महिलांना नीच भूमिका देतात.’
पुढे अभिनेत्याने ‘बालिका वधू’ मालिकेबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘बालिका वधू मलिकाचा मी एक भाग होतो. मालिकेने अनेकांना प्रेरणा दिली आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की या मालिकेने महिलांची सुरक्षा आणि मुलींच्या शिक्षणासाठी खूप योगदान दिलं. अशा प्रकारचा कंटेंट केल्यानंतर माझे निर्मात्यांशी खूप भांडण झाले आणि मी काही शो सोडले.’ असं देखील अभिनेता म्हणाला.
विक्रांत मेसी याच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने ‘बालिका वधू’, ‘धरम वीर’ आणि ‘बाबा ऐसो वर ढूंढो’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय अभिनेत्याचा ’12th फेल’ सिनेमा चाहत्यांनी डोक्यावर घेतला. चित्रपगृहात देखील सिनेमाने तगडी कमाई केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सिनेमा लोकप्रिय ठरत आहे.