अंकिता लोखंडे ठरली बिग बॉस 17 ची महागडी स्पर्धक?

दरवर्षी चाहते सलमान खानच्या वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ची आतुरतेने वाट पाहत असतात. वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय टिव्ही शो बिग बॉस हा नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. बिग बॉस च्या 17 व्या सिझनची बरीच चर्चा आहे. या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे.

यानंतर बिग बॉसच्या घराची पहिली झलकही समोर आली होती. आता बिग बॉस 17 संबधित अनेक नवे अपडेट समोर येत आहे. यातच मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडे ही या शोची पहिली कन्फर्म स्पर्धक आहे. ती घरात तिचा पती विकी जैनसोबत जाणार आहे.

इतकच नाही तर अंकिताने शोमध्ये जाण्यासाठी 200 आउटफिट्स खरेदी केले आहेत अशीही चर्चा सुरु होती. त्यातच आता अंकिता ही या शोची सर्वात महागडी स्पर्धक असणार आहे असा दावा केला जात आहे.

बिग बॉस 17 च्या नव्या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये अंकिताचं नाव गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होतं. अंकिता ही बिग बॉस 17 ची सर्वात महागडी स्पर्धक असणार आहे. अंकिताची दर आठवड्याचे मानधन 10 ते 12 लाख रुपये असणार आहे असं सांगितले जात आहे.

तर तिचा पती विकी जैनच्या किती फी घेतली आहे .याची माहीती समोर आलेली नाही. मात्र याबाबत अजून काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तर बिग बॉस 16 च्या स्पर्धकांबद्दल बोलायचं झालं तर सुंबूल तौकीर खान ही त्या सीझनमधील सर्वात महागडी स्पर्धक होती. या शो मधील स्पर्धकांबद्दल बोलायचे झाल्यास, ईशा सिंग, हर्ष बेनिवाल, ‘उदारियां’ फेम ईशा मालवीय, जय सोनी, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे कलाकार घरात बंद होऊ शकतात अशा चर्चा सुरु आहे.