अफगाणिस्तान शनिवारी भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ आलेल्या भूकंपाच्या पाच धक्यानंतर अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या. या भूकंपात पश्चिम अफगाणिस्तानमध्ये २,००० हून अधिक लोक ठार झाले, तालिबानच्या प्रवक्त्याने रविवारी याबद्दल माहिती दिली आहे. मिळालेल्या या भूकंपाची तिव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी मोजण्यात आली.
आफगाणिस्तानात झालेल्या या भूकंपामुळे मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानते सर्वात मोठे शहर हेरातपासून ४० किमी नॉर्थ वेस्टमध्ये होतं.
भूकंप आल्यानंतर लोक आपली घरे सोडून पळू लागले, सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हेरातमध्ये राहणाऱ्या वशीर यांना माध्यमांना सांगितले की, आम्ही त्या वेळी ऑफिसमध्ये होतो, अचानक इमारत हादरायला लागली. त्यांनी एएफपीला सांगितलं की, भूकंप इताक तीव्र होता की, भिंतीवरचं प्लस्टर पडू लागलं आणि भिंतींना भेगा पडल्या, याव्यतिरिक्त इमारतीचा काही भाग देखील कोसळला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, अद्यापही माझ्या कुटुंबियांसी संपर्क होऊ शकलेला नाहीये. मोबईल डिस्कनेक्ट झाले आहेत. आम्ही खूप घाबरलो आहोत. दरम्यान आफगाणिस्तान नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या प्रवक्त्याने सांगितलं की ग्रामिण भागात आणि डोंगराळ भागात भुस्खलनाच्या घटना देखील घडल्या आहेत. या घटनांमध्ये देखील अनेक लोक दगावले असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल सध्या आमच्याकडे माहिती नाहीये.
हेरातला अफगाणिस्तानची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. येथे तब्बल १९ लाख लोक राहतात. मागील वर्षी अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपात कमीत कमी १००० लोकांचा मृत्यू झाला होता.