केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या परीक्षेला बसणार्या लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दिलेल्या वेळेत तपासणे हा शिक्षकांसाठी बर्याच वेळा ताणाचा विषय ठरतो.यामुळे काही वेळा उत्तरपत्रिका तपासताना काही त्रुटी राहून जातात. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
यामध्ये महत्त्वाचे विषय फक्त पदव्युत्तर शिक्षक तपासतील, एक शिक्षक दररोज फक्त 20 मुख्य परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणार आहेत, तसेच गुणवत्ता मूल्यमापनासाठी शिक्षक दर तासाला तीन उत्तरपत्रिका तपासतील, असा निर्णय सीबीएसईतर्फे घेण्यात आला आहे.