लाडक्या लेकीला मिळणार एक लाख! असा घ्या योजनेचा लाभ

मुलीच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना एक एप्रिल २०२३ पासून सुरू झालेली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये मिळतील, अशी तरतूद राज्य सरकारने केली आहे. ‘लेक लाडकी’ या योजनेतंर्गत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करेल. ही आर्थिक मदत मुलीचे १८ वर्ष वय होईपर्यंत सरकारकडून दिली जाईल.

या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील मुलींना दिला जातो. पहिलीत सहा हजार रुपये, सहावीत सात हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये; तर १८ वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख ७५ हजार रुपये सरकारकडून मिळणार आहेत.

असा करा अर्ज –

आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे या अर्जाचा नमुना असेल- योजनेच्या लाभासाठी अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करावा- अर्जावर वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती- बँक खाते तपशील- योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी अर्ज केला ते लिहावे- तारीख, ठिकाण टाकून स्वाक्षरी करावी- अर्ज भरून दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून अर्जाची पोहोच पावती घ्यावी.

कागदपत्रे काय लागतील –

लाभार्थींचा जन्माचा दाखला- उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे)

लाभार्थींचे आधार कार्ड ( प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील)-

पालकाचे आधारकार्ड- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स- मतदानकार्ड- रेशनकार्ड-शाळेच्या दाखल्याची झेरॉक्सकुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र