पहिल्यांदाच ‘या’ लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय….

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत.यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत.

48 हजार तृतीयपंथीयही मतदान करणार असल्याची माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये देशात पहिल्यांदाच घरोघरी मतदानाची सोय केल्याची घोषणा केली आहे.

या लोकांचं घरोघरी जाऊन होणार मतदानमतदारांमध्ये यंदा 82 लाख मतदार हे 85 वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ज्यांना पोलिंग बुथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी घरोघरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय करण्यात आली आहे.

दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे.जास्तीत जास्त आणि प्रत्येकाने मतदान करावं यासाठी आम्ही ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराजवळ असणाऱ्या पोलिंग बुधवर मतदान करावं, असं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. यासाठी एक फॉर्म देण्यात येणार आहे तो भरावा लागणार आहे.