मोठी बातमी! सोलापूरसाठी भाजपकडून ‘हे’ नाव निश्चित…..

नुकतेच भाजपची दुसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन भाजपने स्थानिक इच्छुकांची तोंड बंद केली.विरोधात बोलण्यास कुणालाही पर्याय उरला नाही त्यामुळे आता सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात ही तसाच तगडा, त्या लेव्हलचा, आक्रमक बोलणारा उमेदवार सोलापूर लोकसभेला मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तो उमेदवार म्हणजे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव ऐकण्यास मिळते.

माळशिरसचे आमदार राम सातपुते हे सुद्धा आक्रमक वक्तृत्व शैलीचे नेते आहेत. विधानसभेत प्रत्येक प्रश्न ते तळमळीने मांडतात. ते माळशिरसचे आमदार असतानाही त्यांनी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चा प्रश्न विधानसभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता.

मतदार संघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जरी ते इतर जिल्ह्यातले असले तरी मागील पाच वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगले ओळख निर्माण केली आहे.

भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत तितक्याच ताकतीची पाहायला मिळेल.