ई.. किती किळसवाणं, जोडप्याच्या कृत्याने प्रवाशांनी झाकले डोळे; पहा VIDEO

दिल्ली मेट्रो अन् व्हायरल व्हिडिओ हे प्रकरण काही नवीन नाही. दिल्ली मेट्रोमधील प्रवाशांचे मेट्रोमधील चित्रविचित्र प्रताप काही थांबायचे नाव घेत नाहीत. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने सगळीच हद्द पार केल्याचे पाहायला मिळत असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घेवू या सविस्तर.

दिल्ली मेट्रो प्रवासाच्या सोई सुविधांपेक्षा त्यामधील व्हायरल व्हिडिओमुळेच नेहमी चर्चेत असते. कधी कपलच्या रोमान्समुळे, कधी प्रवाशांच्या फायटिंगमुळे तर कधी रिल्सस्टारच्या डान्समुळे दिल्ली मेट्रो चर्चेत येत असते. मेट्रो प्रशासनाने असे व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाईही केली, मात्र दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच चालले असून आता तर एका जोडप्याने हद्दच केली.

https://twitter.com/i/status/1711688980616675372

सध्या दिल्ली मेट्रोमधील एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून नेटकऱ्यांनी असा किळसवाणी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा द्या.. अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कपल चक्क एकमेकांच्या तोंडात चुळ मारुन ड्रींक्सचा आस्वाद घेताना दिसत आहे.

वाचूनच अगदी किळसवाणा वाटला ना? पण दिल्ली मेट्रोत हा प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कपल हातात कोल्ड्रिंगची बॉटल घेवून रिल शूट करत आहेत.

हा तरुण पहिल्यांदा या मुलीला कोल्ड्रिंग्स पाजतो. ज्यानंतर ती मुलगी तेच कोल्ड्रिंग त्याच्या सोंडात सोडताना दिसत आहे. २-३ वेळा या दोघांनी केलेली ही किळसवाणी कृती पाहून प्रवाशांनी अक्षरशः डोळेच मिटले. 

व्हिडिओ समोर आल्यानंतप नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्ये करताना लाजा वाटत नाहीत का? असा सवाल काहींनी विचारला आहे, तर एक नेटकऱ्याने थेट ती मेट्रोच बंद करुन टाका.. अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अशा लोकांना मेट्रोमध्ये बंदी घातली पाहिजे, अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.