भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा मॉडर्न डे क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली.या मालिकेसाठी विराटला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याने आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी मालिकेतून नाव मागे घेतलं होतं.

२ महिने लंडनमध्ये राहिल्यानंतर अखेर विराट भारतात परतला आहे. त्याने आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सराव करायला सुरुवात केली आहे. दरम्यान स्पर्धेपू्र्वी विराट नव्या लूकमध्ये दिसून आला आहे.आयपीएल २०२४ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
दरम्यान या सामन्यापूर्वी विराटच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर २ फोटो शेअर केले आहेत.आलिम हकीमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विराटचे काही फोटो शेअर केले आहेत.

ज्यात विराट डॅशिंग लूकमध्ये दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने The Only & Only King Kohli Virat Kohli असं लिहिलं आहे. विराटच्या या लूकवर क्रिकेट फॅन्स देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.