मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतेले जाणार आहेत. सोबतच, 900 एकरवर लवकरच मराठा समाजाची सभा होणार असून, ती सभा कुठे आणि कधी होणार याची देखील घोषणा आजच्या बैठकीत केली जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. सोबतच मनोज जरांगे आज कोणती भूमिका मांडणार हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. तसेच, अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्याकडून सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत हल्लाबोल करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता शेवटचा निर्णय घ्यायचा असून, यासाठी 24 मार्च रोजी आंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलवण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे आज राज्यभरातील मराठा समाज आंतरवाली सराटीत बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.