आयपीएल 2024 स्पर्धेत आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत. यात आतापर्यंत होम ग्राउंडवर खेळणाऱ्या संघाचा दबदबा दिसून आला आहे. आतापर्यंत सातही सामन्यात हे चित्र पाहायला मिळालं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील चेपॉक मैदानावर रंगला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 63 धावांनी जिंकला.
नाणेफेकीचा कौल गमवूनही या सामन्यावर चेन्नईची मजबूत पकड दिसली. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला आहे. तर गुजरात टायटन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 206 धावा केल्या. तसेच विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. गुजरात टायटन्सचा संघ 20 षटकात 148 धावा करू शकला. यामुळे गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने 4 गुणांसह थेट अव्वल स्थानी झेप घेतली.