काँग्रेस-शिवसेनेचा तिढा…..

शिवसेनेच्या उमेदवार यादीतील काही जागांवरून महाविकास आघाडीमधील नाराजीही समोर आली. यांपैकी एक जागा आहे सांगलीची.सांगलीमधून शिवसेनेनं महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. पण काँग्रेसने या जागेवरचा आपला दावा अजूनही सोडलेला नाही.कोल्हापूरच्या बदल्यात आम्ही सांगली लढवत आहोत, हा शिवसेनेचा दावा आहे; तर वाटाघाटीत असं ठरलं नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.

उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, सांगलीच्या जागेचा प्रश्न आता महाविकास आघाडीसाठी संपलेला आहे.संजय राऊत यांनी म्हटलं, पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेकडे एकही जागा नाही. कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती. तीस वर्षे आम्ही ती जागा लढतोय. यावेळेस ती सीटिंग जागा होती. पण शाहू महाराजांचं नाव समोर आल्यामुळे आणि त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही ती जागा काँग्रेसला सोडली.

पश्चिम महाराष्ट्रात आपल्याकडे एकतरी जागा असावी म्हणून आम्ही सांगलीची जागा घेतली आणि ती सर्वांनी मिळून जिंकावी, अशी आमची अपेक्षा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं.