सांगली लोकसभेच्या जागेवरुन मविआमध्ये (Maha Vikas Aghadi) चाललेल्या राजकारणाची भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी खिल्ली उडवली आहे. संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान हे निश्चित नसल्याने लोक संभ्रमात आहेत, तर लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने वेगळी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही.
धनगर आरक्षणाचा मुद्द्या टेक्निकल विषय, तो दुरुस्त करू आणि आरक्षणाचा विषय मार्गी लावू, अशी ग्वाही गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये चाललेल्या राजकारणावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक, बाहेर एक असे काही नसतं. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेला आहोत.
मात्र, अजून देखील भाजपचे उमेदवार संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान आहे हे निश्चित होईना, त्यामुळे अजून सगळे लोक संभ्रमात आहेत असे म्हणत सांगली लोकसभेच्या जागेवरुन मविआमध्ये चाललेल्या राजकारणाची आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली आहे.