रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. RBIच्या स्थापनादिवसाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीउपस्थित होते. सकाळीच मुंबईत पंतप्रधान मोदींचं आगमन झालं. रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे विशेष नाणे जारी केलं.
देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. याशिवाय यामध्ये 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 90 रुपये असं लिहिलेलं आहे.90 रुपयांच्या नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेलं आहे.
नाण्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो असेल आणि वरच्या बाजूला हिंदीमध्ये आणि खाली इंग्रजीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेलं आहे. भारत सरकारच्या टांकसाळीत बनवलेल्या या 90 रुपयांच्या नाण्याचे वजन 40 ग्रॅम आहे. विशेष म्हमजे हे नाणं 99.9 टक्के शुद्ध चांदीपासून बनलेलं आहे. याआधीही 1985 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण जयंती आणि 2010 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम ज्युबिलीवर स्मारक नाणी जारी करण्यात आली होती.