वंचित बहुजन आघाडीनंतर आता सोलापुरात एमआयएम (MIM) देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापूर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असून कदम हे एमआयएमच्या तिकिटावर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.रमेश कदमांनी जर लोकसभा लढवली तर त्याचा फटका काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना बसणार असल्याची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या उमेदवारी संदर्भात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्याशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
सोलापूर लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्याने रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.