सोलापूर येथील गुरुनानक चौकातील सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा २९ फेब्रुवारीपूर्वी उरकला जाणार आहे. लोकसभा आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे.
उद्घाटनाची तयारी तातडीने व्हावी म्हणून मुंबईतील कोविड सेंटरमधून आठ आयसीयू बेड, ६० सलाईन स्टॅण्ड, आयसीयू बेडचे मॉनिटर, असे साहित्य सोलापूर जिल्हा रुग्णालयासाठी आणले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून सोलापूर जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा उरकण्याची लगबग सध्या सुरू आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर लगेचच ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन पाइपलाइन, लिफ्ट, खाटा ठेवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली आहे.