चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने चेन्नईला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने हे आव्हान कॅप्टन ऋतुराज गायकवाड याचं अर्धशतक आणि ऑलराउंडर शिवम दुबे याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर 17.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईने 141 धावा केल्या.चेन्नईचा हा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील तिसरा विजय ठरला. तर कोलकाताचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला.
चेन्नईकडून कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक धावा केल्या. ऋतुराजने 58 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 67 धावांची नाबाद खेळी केली. शिवम दुबे याने 18 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 28 धावा केल्या. डॅरेल मिचेल याने 25, रचीन रवींद्र याने 15 आणि महेंद्रसिंह धोनी याने नाबाद 1 धाव केली. कोलकाताकडून वैभव अरोरा याने 2 विकेट्स घेतल्या. तर सुनील नरेन याला 1 विकेट मिळाली.त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन ऋतुराजच्या फिल्डिंगचा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. चेन्नईच्या गोलंदाजांसमोर कोलकाताचे विस्फोटक फलंदाज अपयशी ठरले. रिंकू सिंह आणि रिंकू सिंह या दोघांना फिनिशिंग टच देण्यात अपयश आलं.
मात्र कॅप्टन श्रेयस अय्यर याने टीमची लाज राखली. श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 32 बॉलमध्ये 34 धावांची खळी केली. तर सुनील नरीन याने 27 आणि अंगकृष रघुवंशी याने 24 धावा जोडल्या. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही. चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. मुस्तफिजुर रहमान याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर महीश तीक्षणा याने 1 विकेट घेतली.