चैत्राला सोने आणि चांदीने महागाईचे तोरण बांधले. दोन्ही मौल्यवान धातूची घौडदौड सुरुच आहे. दरवाढीची गुढी उभारल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. सोने आणि चांदीने एप्रिल महिन्यातच सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले आहे. ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. या मौल्यवान धातूंनी इतकी मोठी झेप कशी घेतली हाच ग्राहकांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. त्यामागे काही जागतिक कारणं आहेत.
सर्वात मोठे कारण, भारतीय रुपयांचे अवमूल्यन हे आहे. डॉलरच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरवाढीत दिसून येत आहे. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या पहिल्या सहा दिवसांत सोने जवळपास 4,000 रुपयांनी तर चांदी 7,000 रुपयांनी वधारली. हा ग्राहकांसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती…..
सोने 4,000 रुपयांनी महागले
- एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने जोरदार मुसंडी मारली.
- 1 एप्रिल रोजी सोन्याने 930 रुपयांची उडी घेतली.
- 2 एप्रिल रोजी 250 रुपयांनी सोने घसरले.
- 3 एप्रिल रोजी 750 रुपयांची दरवाढ झाली.
- 4 एप्रिल रोजी 600 रुपयांनी किंमती वधारल्या.
- तर 5 एप्रिल रोजी 450 रुपयांची स्वस्ताई आली.
- 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची मुसंडी मारली.
- 7 एप्रिल रोजी भाव जैसे थे होते. तर 8 एप्रिल रोजी 300 रुपयांची भर पडली.
- गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,800 रुपये प्रति 10 ग्रॅम
- तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.