हुपरी पंचतारांकित औद्योगीक वसाहतीतील बहुतांश कंपनीच्या व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीचा कर थकवल्याने विकास कामांवर याचा फार मोठा परिणाम झाला आहे. कर वसुलीसाठी हेलपाटे मारावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांनी कर थकविल्याने भागातील ग्रामपंचायतींना विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. याकरीता सर्व सरपंचांनी एकीची वज्रमूठ बांधत थकीत कर वसुलीसाठी अॅक्शन मोडवर आल्याने वसाहतीमधील उद्योजकांत खळबळ उडाली आहे.
महसुली करापैकी ५० टक्के रक्कम औद्योगिक विकास महामंडळाला व ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला देण्याचा शासन निर्णय झाला आहे. यामध्ये महामंडळाची थकीत वसुली शंभर टक्के होते. पण ग्रामपंचायतीच्या कर वसूल होत नाही ती थकवली जाते हे दुर्दैवी आहे. जाणून-बुजून कंपनी व्यवस्थापन या लोकांना दाद देत नाहीत. तळंदगेचे लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांनी सी हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावाची जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त जमीन पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला गेलेली आहे. मात्र याचा न गावाला भरघोस लाभ झालेला नाही हे स्पष्ट केले.
याच्या खालोखाल यळगूड, हुपरी, पट्टणकोडोली, क सांगाव, रणदिवेवाडी, हालसवडे व इतर गावांचा समावेश आहे.याविरोधात कडक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्याचे ठरले.यामध्ये कंपन्याकडून ग्रामपंचायतचा कर वेळेत भरला नाही किंवा वसुलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर लवकरच या सर्व कंपन्यांचे पाणी कनेक्शन बंद करून कंपन्या सील करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. लवकरच औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांनी अडचणींचा पाढा वाचण्यापेक्षा थकीत कर वसुलीसाठी सहकार्य करणेची गरज आहे.