गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी, तसेच मुंबईतील काही जागा वाटपावरुन वाद सुरू होता. शिवालय कार्यालयात आज महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आहे.
यामध्ये आता सांगलीच्या जागेचा तिढा मिटला आहे. आता सांगलीमधून महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
आता ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार आहे. या जागेसाठी कॉंग्रेस देखील आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. अखेर या जागेचा तिढा मिटला असून ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे.